कृषिवार्ता

एकच ध्यास शेतकरी विकास

Post Page Advertisement [Top]

     १९ आणि २० जुलै रोजी महाराष्ट्रात पावसाने जोर धरला होता. आणि मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भात चांगला पाऊस झाला असं असल तरी जो पाऊस पडला तो विखुरलेल्या स्वरूपाचा होता आणि अजूनही महाराष्ट्रातील बराचसा भाग पावसाची प्रतिक्षाच करतोय.
    येणाऱ्या गुरुवारपासून (२५ जुलै) राज्यात पुन्हा एकदा पाऊस जोर धरेल अस भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. तसेच स्कायमेट या खासगी संस्थेनेही राज्यात पावसाचा जोर वाढेल अस सांगितल आहे.
    आता पर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातच सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यातही मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली या जिल्ह्यामध्ये पाऊस कमीच आहे. तर दुसरीकडे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस सरासरीच्या तुलनेत खूपच कमी झाला आहे.
    

No comments:

Post a Comment

Bottom Ad [Post Page]

| Designed by Colorlib