सध्या महाराष्ट्रातील शेतकरी अगोदरच कमी पावसामुळे चिंतेत आहे तर त्यात अजून एक चिंता आता डोकं वर काढू लागलीय ती म्हणजे लष्करी अळी.
ज्या ठिकाणी चांगला पाऊस झालाय किवा हलका पाऊस झालाय अश्या ठिकाणी शेतकऱ्यांनी मका, बाजरी, ऊस यांसारखी पिके घेतली. मात्र आता या पिकांवर अमेरिकन लष्करी अळी चा धोका निर्माण झाला आहे. आणि महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांत या अळी ने आता डोकं वर काढलं आहे.लष्करी अळीचा सगळ्यात जास्त फटका सोलापूर, औरंगाबाद, नाशिक, नगर, कोल्हापूर, सातारा, बुलढाणा जिल्हेआ उरलेल्या मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या ठिकाणांवर आहे.
कुठून आली ही अळी-
अमेरिका, आफ्रिका खंडातील देशांमध्ये प्रथमतः मका पिकावर या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला त्यानंतर तिथून पुढे ती आता भारतात आली आहे.
कोणत्या पिकांना आहे जास्त धोका-
मका या पिकावर सगळ्यात जास्त प्रादुर्भाव होतो. तसेच ऊस आणि ज्वारी यांसारख्या पिकांवरही धोका आहेच.
अळीचा प्रादुर्भाव केव्हा होतो-
ढगाळ वातावरण आणि कमी पाऊस हे या अळीच्या वाढीसाठी पोषक घटक आहेत.
काय आहेत प्रतिबंधात्मक उपाय-
फक्त रासायनिक कीडनाशक वापरून चालणार नाही. तर एकात्मित कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब केला पाहिजे तरच ही अळी आटोक्यात येईल.
No comments:
Post a Comment