ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडणार
जून आणि जुलै महिन्यात राज्यात खूपच कमी पाऊस झाला. फक्त कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर आणि सांगली जिल्हे वगळता बाकीच्या जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. उरलेल्या महाराष्ट्रात मात्र पावसाने चांगलीच दडी मारल्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झालाय. कारण आता निम्मा पावसाळा संपला तरी पाऊस काही पडायचं नावाचं घेत नाही. सोलापूर,बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली , परभणी, वाशिम, यवतमाळ, अकोला, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत खूपच कमी पाऊस झाला.पण विदर्भातील जिल्ह्यांची पावसाची तूट जुलै अखेर बरसणाऱ्या पावसामुळे किंचित शी भरून निघाली आहे. मात्र अजूनही सोलापूर,बीड, उस्मानाबाद, लातूर,जालना यांसारख्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची आवश्यकता आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलाय ऑगस्ट, सप्टेंबर साठी मान्सून अंदाज
दरम्यान कमी पावसाने धास्तावलेल्या शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी मिळाली आहे ती म्हणजे उरलेल्या पावसाळ्यात म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडेल असं भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे. त्यामुळं निदान पिण्याच्या पाण्याची तरी व्यवस्था व्हावी अशीच माफक इश्चा मराठवाड्यातील नागरिकांना आहे.
No comments:
Post a Comment