कृषिवार्ता

एकच ध्यास शेतकरी विकास

Post Page Advertisement [Top]

 

जुलै महिन्यात दमदार पाऊस ऑगस्ट महिना पाऊस कसा ? किरण वाघमोडे monsoon update

३० जुलै २०२२ किरण वाघमोडे - संस्थापक हवामान अंदाज आणि बातम्या

          जून महिन्यात निराश केल्यानंतर जुलै मध्ये राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली. काहीसा अपवाद वगळता राज्यातील सर्वच भागात चांगला पाऊस झाला त्यातही नांदेड नाशिक वर्धा लातूर गडचिरोली धाराशिव या जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत खूप जास्त पाऊस झाला विदर्भात पूरपरिस्थिती पाहायला मिळाली आणि राज्यातील काही जिल्ह्यांत पिकांचे ही नुकसान झाले. पण सांगली जिल्हा मात्र कमी पावसाचा च राहील आत्ता जुलै च्या शेवटच्या काही दिवसांत मान्सून ब्रेक निर्माण झाला आणि बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे तयार झाले परिणामी तापमान वाढून गर्जनेचे ढग तयार झाले आणि सांगली सह इतर दुष्काळी भागात पाऊस पाहायला मिळत आहे पण अजूनही सांगली जिल्ह्यातील पावसाने सरासरी घाटली नाहीये.


ऑगस्ट मध्ये कसा पाऊस ?

सध्या मान्सून चा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकला असला तरीही लवकरच mjo भारतीय समुद्रात ढग निर्मिती आणि कमी दाब क्षेत्र निर्मिती करण्यास पोषक स्थितीत येत आहे परिणामी मान्सून चा आस असलेला कमी दाबाचा पट्टा ही दक्षिणेकडे सरकेल.

ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात राज्यातील दक्षिणेकडील जिल्ह्यांत पाऊस जास्त राहील तर उत्तरेकडील जिल्ह्यांना थोडी वाट पाहावी लागेल. ५ ऑगस्ट च्या आसपास बंगालच्या उपसागरात कदाचित कमी दाब क्षेत्र निर्माण होईल आणि ऑगस्ट च्या दुसऱ्या आठवड्यात सगळीकडेच पाऊस पडेल. काही ठिकाणी हा पाऊस नुकसानकारक ठरेल विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुर येतील. एकूणच ऑगस्ट महिना ही विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकण गोव्यासाठी सरासरीहून काहीसा अधिक पावसाचा राहील.

-          किरण वाघमोडे (विद्यार्थी - एम टेक कृषी अभियांत्रिकी)

 

No comments:

Post a Comment

Bottom Ad [Post Page]

| Designed by Colorlib