कृषिवार्ता

एकच ध्यास शेतकरी विकास

Post Page Advertisement [Top]

 

उद्यापासून मान्सून खंड राज्यात पाऊस ओसरणार ? किरण वाघमोडे monsoon update



२५ जुलै २०२२ किरण वाघमोडे - संस्थापक हवामान अंदाज आणि बातम्या

राज्यात तसेच मध्य भारतात गेले बरेच दिवस साधारण ५ जुलै पासून सक्रिय मान्सून स्थिती पाहायला मिळाली यामागील कारण होते सक्रिय स्थितीत असणारा mjo आणि त्यामुळे बंगालच्या उपसागरात आणि आसपास तयार झालेली कमी दाब क्षेत्रे तसेच अरबी समुद्र आणि शेजारी तयार झालेली कमी दाब क्षेत्र आणि डिप्रेशन यासोबतच मान्सून चा आस असलेला कमी दाबाचा पट्टा ही त्याच्या सर्वसाधारण स्थिती पेक्षा दक्षिण दिशेला सरकला होता. पण आता ही स्थिती बदलणार आहे कारण mjo भारतीय समुद्र भागात सक्रिय नाही सोबतच मान्सून चा आस असलेला कमी दाबाचा पट्टा (मॉन्सून ट्रफ) त्याच्या सर्वसाधारण स्थितीपेक्षा काहीसा उत्तरेकडे व हळूहळू हिमालयाच्या पायथ्याशी मार्गक्रमण करण्यास उद्यापासून २६ जुलै सुरुवात करेल परिणामी राज्यातील पाऊस येत्या काळात कमी होईल तापमान वाढेल व स्थानिक पातळीवर गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता बनेल हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल पण दुष्काळी भागात या पावसाने काहीसा दिलासा मिळू शकतो कारण पर्जन्य छायेच्या प्रभावामुळे मान्सून काळात या ठिकाणी पाऊसमान कमीच राहते. तसेच अतीपावसाने प्रभावित झालेल्या जिल्ह्यांना ही या खंडाने फायदा होईल.



हवामान विभागाच्या उपलब्ध आकडेवारी नुसार (१ जून ते २४ जुलै ) सांगली जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे तसेच अकोला वाशिम सोलापूर अहमदनगर कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्यांत सरासरी इतका पाऊस झाला आहे बाकी जिल्ह्यांत सरासरी हून जास्त पाऊस झाला आहे पण सातारा अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागांत पाऊसमान कमीच आहे.

आपल्या चॅनल वर आणि या ब्लॉग वर ऑगस्ट महिन्यातील पावसासंबंधित अंदाज लवकरच देण्यात येईल.

-          किरण वाघमोडे (विद्यार्थी - एम टेक कृषी अभियांत्रिकी)

No comments:

Post a Comment

Bottom Ad [Post Page]

| Designed by Colorlib