कृषिवार्ता

एकच ध्यास शेतकरी विकास

Post Page Advertisement [Top]

 

हवामान विभागाचा अंदाज चुकला जून महिन्यात इतक्या टक्के पाऊस जुलै ची काय स्थिती



३० जून २०२० किरण वाघमोडे - संस्थापक हवामान अंदाज आणि बातम्या

मान्सून आगमन लवकर होईल असे हवामान विभागाने मे महिन्यात सांगितले तसे केरळ मध्ये मान्सून वेळेआधी दाखल झाला पण ते आगमन काहीसे कोरडे निघाले आणि मान्सून कर्नाटक किनारपट्टीवर वेगाने पुढे सरकला मात्र तिथून पुढे मान्सून ची चाल मंदावली आणि राज्यात मान्सून उशिरा दाखल झाला आधीच मान्सून पूर्व पाऊस ही कमी आणि त्यात मान्सून वारे उशिरा दाखल झाल्याने शेतकऱ्यांचे पेरणीचे नियोजन चुकले. मान्सून दाखल झाल्यावरही राज्यात पाऊस मात्र थोड्याच ठिकाणी झाला हवामान विभागाने जून महिन्यात चांगला पाऊस पडेल असे सांगितले होत पण प्रत्यक्षात पाऊस कमीच झाला आहे खाली नकाशांमध्ये हवामान विभागाकडून आलेली पाऊस टक्केवारी दिली आहे विभागनिहाय आणि जिल्हानिहाय (संबंधित आकडेवारी हवामान विभागाने मोजलेल्या पावसाची आहे ती माहिती जिल्हानिहाय आणि विभागनिहाय आहे तालुकानिहाय किंवा गावनिहाय नाही). विभागनिहाय जर पाहिलं तर मराठवाडा विभागात जून महिन्यात सरासरी इतका पाऊस झाला आहे तर दुसरीकडे कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ विभागात पाऊस सरासरी च्या तुलनेत कमी झाला आहे


वरील नकाशा विभागनिहाय पाऊस टक्केवारी चा आहे

जिल्हानिहाय पाहिलं तर संभाजीनगर बीड लातूर परभणी जिल्ह्यांत सरासरीहून जास्त पाऊस; धाराशिव अहमदनगर सोलापूर नांदेड धुळे सिंधुदुर्ग सरासरी च्या आसपास; रत्नागिरी रायगड मुंबई पालघर नंदुरबार नाशिक जळगाव हिंगोली जालना बुलढाणा वाशिम अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया सरासरी हून कमी पाऊस; सातारा पुणे सांगली कोल्हापूर सरासरीहून खूप कमी पाऊस. पण हवामान विभागाचा दुसरा नकाशा पाहिला तर कळेल नाशिक संभाजीनगर अहमदनगर जिल्ह्यातील शेजारचे भाग धाराशिव लातूर सोलापूर चा थोडा धाराशिव ला लागून असलेला भाग जास्त पाऊस झाला आहे  बाकी भाग पाऊस कमी झाला आहे.

वरील नकाशा जिल्हानिहाय पाऊस टक्केवारी चा आहे


वरील नकाशा ही पडलेला पाऊस सरासरी पाऊस आणि सरासरीच्या तुलनेत झालेला पाऊस दर्शवतो

हवामान अंदाज आणि बातम्या यू ट्यूब चॅनल वर मी दिलेला अंदाज हा काही अंशी योग्य काही ठिकाणी चुकीचा ही ठरला. जून महिन्यात सुरुवातीच्या १५ दिवसांत राज्यात पाऊस कमी राहील हा अंदाज अगदी खरा ठरला पण दुसऱ्या १५ दिवसांत म्हणजे १५ तारखेच्या पुढे पाऊस वाढेल असा अंदाज होता पण प्रत्यक्षात पाऊस फक्त काही  जिल्ह्यांत वाढला आणि त्या पावसाने सरासरी पाऊस टक्केवारी काही जिल्ह्यांना घाटता आली तेव्हा काही प्रमाणात का होईना माझा अंदाज बरोबर झाला.

जून महिना कोरडा जाण्यासाठी बरेच घटक कारणीभूत आहेत त्यातील महत्वाचा घटक हा एम जे ओ ( mjo) आहे जो सुरुवातीपासूनच भारतीय समुद्रात किवा त्याच्या जवळपास नव्हता त्यामुळे मान्सून ची सुरुवात ही फिकी झाली.

जुलै चा अंदाज काय ?

हवामान अंदाज आणि बातम्या चा : अंदाज जुलै महिन्यात mjo बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र निर्माण करण्यासाठी अनुकूल स्थितीत आहे तेव्हा जुलै च्या पहिल्या १५ दिवसांत राज्यात सरासरी हून जास्त पाऊस होऊ शकतो खासकरून विदर्भ उत्तर मराठवाडा कोकण घाटमाथा उत्तर महाराष्ट्रातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे किंवा तालुके जास्त पावसाचे राहतील पण तिथून पुढच्या १५ दिवसांची माहिती नंतर देण्यात येईल. सविस्तर माहितीचा अंदाज लवकरच यू ट्यूब चॅनल वर अपलोड केला जाईल.

 

No comments:

Post a Comment

Bottom Ad [Post Page]

| Designed by Colorlib